ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार प्रा. विजय मुडे ‘कर्मवीर पुरस्काराने’ सन्मानित!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :_ पत्रकारितेतील निष्ठा, अखंड ध्येयवाद आणि निरलस समाजसेवेचा वसा आयुष्यभर जोपासणाऱ्या ब्रम्हपुरी येथील ‘दैनिक हितवाद’चे तालुका प्रतिनिधी तथा अर्धसाप्ताहिक ‘ब्रम्हपुरी समाचार’ वृत्तपत्राचे व्यवस्थापक, ज्येष्ठ पत्रकार प्रा. विजय मुडे यांना चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात पार पडलेल्या दिमाखदार ‘दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम, तथा कर्मवीर पुरस्कार व उत्कृष्ट वृत्तांत स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा’ या कौतुक सोहळ्यात हा सन्मानचिन्ह वितरणाचा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

              दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा तथा जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा मनस्वी संदीप गिऱ्हे या प्रामुख्याने उपस्थित होत्या. पत्रकारिता आणि समाजकारणातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शान अधिकच वाढली होती.

             कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पत्रकारांच्या हक्कासाठी आणि समाजहितासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्तृत्ववान पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. ब्रम्हपुरी तालुक्यात पत्रकारितेचा दीप तेजत ठेवणाऱ्या प्रा. विजय मुडे यांना प्रमुख अतिथी मनस्वी संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर व सचिव प्रवीण बदकी प्रामुख्याने उपस्थित होते. हा क्षण उपस्थित तमाम पत्रकारांसाठी गौरवाचा आणि प्रेरणादायी ठरला.

            यावेळी बोलताना उपस्थितांनी प्रा. विजय मुडे यांच्या पत्रकारितेचा प्रवास वर आणि त्यांच्या अफाट लोकसंग्रहावर सविस्तर प्रकाश टाकला. सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर परखडपणे भाष्य करतानाच नेहमीच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम मुडे यांनी निष्कलंकपणे केले आहे. प्रामाणिकपणा, निर्भीड बाणा आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांची ओळख आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने प्रा. मुडे यांना ‘कर्मवीर पुरस्कार’ देऊन खऱ्या अर्थाने एका व्रतस्थ पत्रकारितेचा आणि पत्रकाराचाच यथोचित सन्मान केला आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आल

         याच सोहळ्यात उत्कृष्ट वृत्तांत स्पर्धेतील विजेत्यांनाही गौरविण्यातआलेपुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. विजय मुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकारितेतील आव्हाने, पत्रकारांची सामाजिक बांधिलकी आणि हा मिळालेला पुरस्कार आपल्या पुढील प्रवासासाठी अधिक ऊर्जा देणारा ठरेल, असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

              या दिमाखदार सोहळ्याला चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रा. विजय मुडे यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये