ताज्या घडामोडी

चंद्रपूर जिल्ह्याला भूकंपाचे दोन सौम्य धक्के

बल्लारपूर व राजुरा तालुक्यात केंद्र असल्याची प्राथमिक माहिती

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के नोंदवल्या गेले असुन रिस्टर स्केल वर त्यांची तीव्रता 2.5 व 3.2 असल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्या भूकंपाचे केंद्र बल्लारपूर नजीक तर दुसरा भूकंप राजुरा तालुक्यातील जोगापूर जंगलाच्या क्षेत्रात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ह्यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने ज्येष्ठ अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी जिल्ह्याला भूकंपाचे दोन धक्के बसल्याची पुष्टी केली असुन त्यातील एकाचे केंद्र बल्लारपूर तर दुसऱ्याचे राजुरा नजीकच्या जोगापूर जंगलात असल्याची माहिती दिली आहे. हे दोन्ही धक्के इतके सौम्य होते की त्याची जाणीव कुणालाही झाली नाही मात्र रिस्टर स्केल वर दोन्ही धक्के नोंदवल्या गेले आहेत असे त्यांनी सांगितले.

भूगर्भात नेहमीच उलथापालथ होत असते त्यामुळे असे लहानमोठे भुकंप जगाचा पाठीवर सुरूच असतात मात्र चंद्रपूर जिल्हा हा भुकंप प्रवण क्षेत्रात येत नसुनही अधूनमधून जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत असण्याचे कारण म्हणजे ह्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेले उत्खनन असल्याचे मत त्यांनी नोंदविले असुन बरेचदा कोळसा खाणींमध्ये वर्धा नदीचे पाणी शिरल्याने भूकंपाचे धक्के जाणवू शकतात असेही त्यांनी सांगितले असुन ह्या भूकंपामुळे जनतेने घाबरून जाण्याचे काही कारण नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये