ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छटपूजेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, एकता आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा संदेश – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुरातील विविध छटपूजा सोहळ्यांना आमदार किशोर जोरगेवार यांची भेट

चांदा ब्लास्ट

 भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे विविधतेतून जपली जाणारी एकता. प्रत्येक सण आणि उत्सव आपल्याला श्रद्धा, भक्ती, सामाजिक सलोखा आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेची शिकवण देतो. छटपूजा हा सूर्यदेव आणि छटमैय्येप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा श्रद्धेचा महत्त्वपूर्ण उत्सव असून, या पूजेच्या माध्यमातून निसर्ग, आरोग्य आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीची कामना केली जाते. चंद्रपूर शहरात हिंदी भाषिक बांधवांकडून मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजर्या होणार्या छटपूजा सोहळ्यांमध्ये सहभागी होत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा आनंद मिळाला, अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

  छटपूजेच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरातील विविध ठिकाणी आयोजित छटपूजा सोहळ्यांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत त्यांना छटपूजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच छटमैय्येचे दर्शन घेत पूजाविधीत सहभाग नोंदविला आणि भगवान सूर्यदेवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी भाविकांच्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात ते सहभागी झाले.

    छटपूजा हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि सामूहिक श्रद्धेचे दर्शन घडविणारा उत्सव आहे. भगवान सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. या उत्सवात महिलांची श्रद्धा, त्यांचे कठोर व्रत आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी निष्ठा विशेषत्वाने दिसून येते. अनेक भाविक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात, यातून सामाजिक एकता आणि बंधुभावाचे दर्शन घडते.

   यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर शहर हे विविध भाषा, धर्म आणि संस्कृतींचा सन्मान करणारे शहर आहे. प्रत्येक समाजाच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे ही आपल्या सामाजिक एकतेची परंपरा आहे. हिंदी भाषिक बांधवांकडून छटपूजा अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. त्यांच्या या श्रद्धेचा आणि परंपरेचा आदर करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आपल्याला एकमेकांशी जोडण्याचे आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचे काम करतो.

   छटपूजेच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी भाविकांनी केलेली सजावट, पूजाविधी आणि सामूहिक सहभाग यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या उत्सवाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे सुंदर दर्शन घडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये