भाजपा पोंभुर्णा कार्यालयात धरती आबा क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने धरती आबा, आदिवासी जननायक क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती भाजपा कार्यालय, पोंभुर्णा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला संघर्ष व त्यांचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित करून जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक लढा उभारला. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांच्या विचारांतून आजही मिळते. त्यांचे कार्य आणि त्याग पुढील पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहतील, असे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष हरीश ढवस, राहुल भाऊ संतोषवार (माजी जिल्हा परिषद सदस्य), अजित मंगळगिरीवार (उपाध्यक्ष, नगरपंचायत पोंभुर्णा), गजानन मडावी (तालुकाध्यक्ष, आदिवासी आघाडी), शुभम कुळमेथे (तालुका महामंत्री, आदिवासी आघाडी), दिलीप म्याकलवार सर, खुशवंत गेडाम, गणेश नेता, मोहन चलाख, राजू ठाकरे (माजी नगरपंचायत सदस्य), विजय वासेकर, वेणुदास गेडाम यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



