ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अध्यात्मातून भक्ती, सेवाभाव आणि सदाचाराचा मार्ग प्रशस्त होतो – आ. जोरगेवार

जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या दर्शन सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती, माता महाकालीची मूर्ती भेट देत केले स्वागत

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_  अध्यात्म हे केवळ ईश्वरभक्तीचे माध्यम नसून ते माणसाला चांगले आचरण, सेवाभाव आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीव करून देणारे प्रभावी माध्यम आहे. संत-महात्म्यांचे विचार आणि मार्गदर्शन माणसाला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी देतात. भक्तीच्या माध्यमातून माणसाने माणसाशी जोडले जावे, समाजात सद्भावना आणि सेवाभाव वृद्धिंगत व्हावा, हीच संतपरंपरेची शिकवण असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

चंद्रपूर येथील डगाव परिसरात जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी महाराजांचे अनमोल विचार आणि आध्यात्मिक मार्गदर्शन श्रवण करण्याचा लाभ त्यांना मिळाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राज्य कार्यकारणी परिषद सदस्य, महामंत्री रविंद्र गुरुनुले, महामंत्री नामदेव डाहुले, बलराम डोडाणी, सुमीत बेले आदिंची उपस्थिती होती

याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीची मूर्ती भेटस्वरूपात देत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे चंद्रपूर नगरीत स्वागत केले. चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीची मूर्ती महाराजांना भेट देऊन त्यांनी शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान व्यक्त केला.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनातून भक्ती, सेवा, सदाचार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे. अध्यात्म माणसाला केवळ स्वतःच्या उन्नतीचा विचार करायला शिकवत नाही, तर इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणाही देते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाने आपल्या संस्कारांशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी जोडलेले राहणे आवश्यक आहे. संत-महात्म्यांच्या विचारांचे आचरण केल्यास समाजात सकारात्मकता, बंधुभाव आणि सद्भावनेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या सोहळ्यादरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित भाविक-भक्तांशी संवाद साधला. महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या विचारांचे श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळाली.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या चरणी विनम्र नमन करत त्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये