Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा तालुक्यातील वाळू माफिया जोमात ; महसूल विभाग कोमात?

अर्थ पुर्ण व्यवहारातून साठेगांव दुसरबिड,ताडशिवणी येथून रात्रंदिवस रेती उत्खनन सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून कोट्यावधी रुपयाची अवैध रेती उत्खनन महसूल विभागाच्या आशिर्वादाने आर्थिक देवाणघेवाण करून अवैध रेती उत्खनन सुरू असून रेती तस्कर जोमात तर महसूल विभाग कोमात असल्याचे चित्र तालुक्यात सद्या सर्रास दिसत आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील जिवनवाहीनी असलेली खडकपूर्णा नदीमाय रेती तस्करांमुळे खडकाळ झाली असून रेती उत्खननामुळे परीसरातील नागरीकांना भिषण पाणीटंचाई चा चटका सोसावा लागत आहे या खडकपूर्णा नदीपात्रात अश्मयुगीन रेती मानवी तस्करांकडून नामशेष होण्याच्या मार्गावर असून अवघ्या दोन वर्षांत सदर रेती नामशेष होऊन नावालच खडकपूर्णा माय राहील एवढे नक्की सदर खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाच्या लाचखोर अधिकारी यांनी पुढाकार घेतल्याने ही खडकपूर्णा माय खडकाळ बनली आहे आज रोजी तालुक्यातील साठेगाव दुसरबिड,ताडशिवणी येथील खडकपूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस रेतीची अवैध उत्खनन जेसीबी व पोकलॅड मार्फत सुरू असून सदर रेती उत्खनन व वाहतूक महसूल विभागाच्या अर्थ पुर्ण व्यवहारातून सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रात भेट दिली त्यानंतर तर रेती तस्कर जोमात तर महसूल विभाग कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सिंदखेडराजा तालुक्यातील महसुल विभागात कठोर व कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे, तहसिलदार प्रविण धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वी तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतूकीला मोठ्या प्रमाणात लगाम घातला असतांना आता वरील गावातून रात्रंदिवस खुलेआम अवैध उत्खनन व वाहतूक कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे हा यक्षप्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.

नुकतेच निमगाव वायाळ येथील महिला सरपंच यांनी महसूल विभागाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सदर घाटाचे मोजमाप झाले मात्र सदर मोजमाप चा अहवाल महसूल विभाला प्राप्त झाला नसल्याने अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तर या मोजमापात सहा लाख अवैध उत्खनन झाल्याची सार्वजनिक बांधकाम विभागात चर्चा असल्याने अनेक राजकीय नेते हा अहवाल बदलण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये