ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राघव झोरे नॅशनल ऍथलेटिक स्पर्धेत चमकला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी राघव कैलास झोरे याने 200 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक पटकावून बालाजी महाराजांच्या नगरीच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला आहे. दरम्यान जुलै महिन्यात नेपाळ येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय एथलेटिक स्पर्धेत राघव भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. देऊळगाव राजा येथील राघव कैलास झोरे यांनी 14 वर्ष खालील वयोगटात 200 मीटर अथलेटिक्स स्पर्धेत पंजाब येथे सुवर्णपदक पटकावले त्याबद्दल त्याचा पालकासह सत्कार जनसेवा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाला जनसेवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री मापारी मामा, श्री प्रकाश खांडेभराड,श्री आर डी नरोडे, श्री प्रकाश अहिरे, श्री मधुकर शेळके, श्री कैलास भाऊ झोरे, श्री सुभाष लोखंडे, श्री बोरकर, तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये