ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमच्या पैशातून भांडवलदारांची हजारो कोटी रुपयांची कर्जमाफी

डाॅ.राजरत्न आंबेडकर यांचा घणाघात ; गोंडपिपरीत पार पडली महासभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ सरकार मोठमोठया उदयोजकांचे हजारो कोटी रूपयाचे कर्ज माफ करित आहे. देशातील विविध महत्वाच्या बॅकाच्या माध्यमातून हा प्रकार खुलेआम सुरू आहे. आमच्या पैशाच्या भरवशावर हा सारा बोगस प्रकार सुरू आहे. यामुळे आता आपणास जागृत होण्याची गरज आहे. “पैसा आमचा _ आम्हीच भागीदार” या तत्वावर काम करण्यासाठी आपण सर्वांना पुढाकार घेण्याची अतिशय आवश्यकता आहे.

 आमच्या पैशाचा उपयोग आपल्यासाठी झाला पाहिजे. याकरिता आपणच बॅकांची निर्मीती करून त्याचा उपयोग आपल्या समाज बांधवांसाठी व स्वतंःसाठी कसा करता येईल याचा गंभीर विचार करून त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे प्रतीपादन दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौध्द महासभा तथा डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट क्रेडीट को. आप. सोसायटी बॅेकेेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.राजरत्न आंबेडकर यांनी केले.

 भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा गोंडपिपरी च्या वतीने काल 11 ऑक्टोबर रोजी गोंडपिपरी येथील लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात महासभेचे आयोजन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करित होते.

  यावेळी भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय महासचिव राहुल शेंडे, नागपूरचे विभागीय अध्यक्ष आकाश चौरे, जिल्हाध्यक्ष आनंद वनकर, वैध मापनशास्त्र अधिकारी रूपचंद फुलझेले, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णमाला भगत, अमावश्या निमसरकार आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तथा जेष्ठ साहित्यीक उध्दव नारनवरे यांनी आपल्या मनोगतातून समाजाकरिता हा उपक्रम अतिशय महत्वाचा असल्याचे मनोगत व्यक्त केले. डाॅ.राजरत्न आंबेडकर यांचे गोंडपिपरी येथे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यत रॅली काढण्यात आली. यात समता सैनिक दलाच्या पथकाचा समावेश होता. यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद वनकर यांनी केले तर आभारप्रदर्षन बुध्द विहार समन्वयक समर्थ भसारकर यांनी मानले. आपल्या लोकांचा आर्थीक विकास साध्य करायचा असेल तर आता भुमिका घ्यावी लागेल असा सुर या कार्यक्रमातून उमटला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये