Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जवळखेड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान तर्फे यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जवळखेड येथे 31 में ला समाजातील यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान जवळखेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक श्री. रामजी गाटोळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगावराजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संतोष महल्ले  हे होते.प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. राजेंद्र गाडेकर,डॉ. सुनील कायंदे,डॉ. रामप्रसाद शेळके,श्री. मनोज कायंदे, होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. राजेंद्र सोरमारे यांची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती डॉ. आकांक्षा राजेंद्र गाडेकर, तसेच डॉ. प्रतीक्षा लक्ष्मण सोरमारे यांचा अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान तर्फे सहपरिवार सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमांमध्ये बोलताना डॉ. सुनील कायंदे यांनी बालविवाह बद्दल जनजागृती केली तर श्री. मनोज कायंदे यांनी हा परिसर पर्यटन स्थळ होईल असा आशावाद व्यक्त केला,

तर डॉ. रामप्रसाद शेळके यांनी सर्व समाज बांधवांना संबोधित केले. याचबरोबर डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी स्वतःचे सामाजिक क्षेत्रातील अनुभव व्यक्त केले तसेच डॉ. आकांक्षा राजेंद्र गाडेकर आणि डॉ.प्रतीक्षा सोरमारे यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी जीवनातील वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केले. तर प्रा.राजेंद्र सोरमारे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुखदेव गाटोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री राजेंद्र गाटोळे यांनी केले.

 या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच समाज बांधव आणि महिलावर्ग उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये