Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1 हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासीत करण्याची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमणा मधील मौजा कळमणा गावालगत असलेली संरक्षीत वनखंड क्रमांक 571 मध्ये कळमणा येथील अंदाजे 7 ते 8 नागरीकांनी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने 1.00 हेक्टर क्षेत्रावर झोपड्या तयार केल्याचे गस्ती दरम्यान नियतवनरक्षक कळमणा यांना निदर्शनास आले. त्यांनी या बाबत तात्काळ माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांनी दिली.

त्याअनुषंगाने दिनांक 01 जुन 2024 ला सकाळी 9.00 वाजताचे सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे आपल्या अधिनस्त वनकर्मचारी समवेत मौक्यावर हजर झाले. त्यांनी अतिक्रमण धारकांना जमीनीचे दस्ताऐवजाची मागणी केली असता अतिक्रमण धारकांकडे सदर जागेबाबत कुठलेही कागदपत्रके नसल्याचे मौक्यावर आढळुन आले. त्यानंतर दोन पंचासमक्ष मौक्यावर पंचनामा नोंदवुन वनखंड क्रमांक 571 मधील अंदाजे 1.00 हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासीत करण्याची कार्यवाही करण्यात आली व त्यानंतर जमीन सपाट करुन TCM खोदण्यात आले.

श्रीमती. स्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर व श्री. आदेशकुमार शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनात श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांचे नेतृत्वात सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता क्षेत्र सहाय्यक श्री.बि.टि.पुरी, श्री.कोमल घुगलोत, श्री.व्हि.पी. रामटेके व नियतवनरक्षक श्री.सुधीर बोकडे, श्री. परमेश्वर आनकाडे, श्री. मनोहर धाईत, श्री. सुनील नन्नावरे, कु. राजश्री मुन, श्री. अनिल चौधरी, कु.भारती तिवाडे व रोजंदारी वनमजुर यांनी परिश्रम घेवुन मोहिम यशस्वीरित्या पार पाडली.

सदर कार्यवाही करीता श्री. संघर्ष रेनकुंटलवार, सदस्य ग्राम पंचायत, कळमणा यांनी वनविभागाला सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये