Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इनरव्हील क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       स्थानिक सुमठाना येथील मल्हारी बाबा सोसायटी येथे बाल संस्कार शिबिर सुरू असून या शिबिरात १०० विद्यार्थी सहभागी झाले असून या शिबिराला येथील इनरव्हील क्लब क्लब ने भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले.

सदर शिबिर सकाळी सहा वाजता पासून सुरू होत असून या शिबिरात योगा पासून तर लाठी- काठी, सांस्कृतिक कार्यक्रम तर दुपारी योग्य मार्गदर्शन, संस्काराचे आयोजन करण्यात येत असून हरिपाठ घेऊन दिवसाची सांगता करण्यात येते. इनरव्हीलच्या या वितरण समारंभाला सुनंदा खंडाळकर, वर्षा धानोरकर, वंदना धानोरकर, विश्रांती उराडे, तृप्ती हिरादेवे, विभा बेहरे,कीर्ती गोहणे, शुभांगी बोरकुटे आदींचा सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये