ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धोपटाळा येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील धोपटाळा येथे दिनांक 22,23,आणि 24 एप्रिल 2024 ला हनुमान मंदिर वास्तु पूजन व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

ग्राम सहभागातुन निर्माण केलेल्या हनुमान मंदिर चे बांधकाम व मंदिरात हनुमान जयंती च्या शुभ पर्वावर हनुमान मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी ह.भ.प.प्रशांत महाराज ठाकरे यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाच्या दिवशी नैसर्गिक संकटावर मात करत व गावकऱ्याची कीर्तनाबाबतची उत्सुकता व आवड बघून महाराजांनी रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत समस्त गावकऱ्यावर विचारांची उधळण केली.

दुसऱ्या दिवशी वढयाचे चैतन्य महाराजासमक्ष नवीन मंदिरात हनुमान जी ची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. शेवटच्या दिवशी गावात भजन मंडळीसह दिंडी काढून महाप्रसादाचे आयोजन केले गेले.

संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समस्त गावकऱ्यानी मेहनत घेतली व गावात एकीचे दर्शन दाखवले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये