ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरात दोन दुकान चोरट्याने फोडले

२.७० लाख रुपये लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- शहरात चोरट्याने आपले डोळे उघडले असून मुख्य मार्गावर असणाऱ्या चष्माचे दुकान व हार्डवेअर चे दुकान पहाटे च्या सुमारास फोडले असून दोन लाख सत्तर हजार रुपये चोरी केल्याची घटना २५ एप्रिल रोजी उघडकीस आली.

        येथील मुख्य मार्गावर सेंटर पॉइंट बार जवळ गुरूदयाल सिंग दिगवा यांच्या मालकीचे लक्की ऑप्टिकल व आय केअर दुकान आहे. त्यांच्या मुलाने २२ एप्रिल रोजी मनिपुरम गोल्ड लोन बँकेतून सोने गहाण ठेवून ४ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यातून त्यांच्या मुलाने १.३० लाख रुपये आपल्या कामासाठी खर्च केले होते. बाकीचे २.७० लाख रुपये दुकानाच्या ड्रायवर मध्ये ठेवले होते अश्यातच पहाटे च्या ४.४५ वाजताच्या सुमारास चोरट्याने अर्धवट शेटर उचलून ड्रायवर मधील रक्कम चोरून लंपास झाले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चार चोर दिसत असून दोन चोर शटर उचलून आत मध्ये गेले. तसेच त्या चोरट्यांनी बालाजी कॉम्प्लेक्स येथील विश्वकर्मा हार्डवेअर दुकानाचे शटर उचलून चोरी केली. त्यात फक्त ४५० रुपये चोरी गेले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये