ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बलात्कार प्रकरणी आदिवासींचा मोर्चा

बहुजनांचे संरक्षण करा अथवा हत्यार वापरण्याचा परवाना द्या - डॉ. गोतावळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

नुकताच मणिपूर प्रकरण शांत होत नाही तोवर देशात अनेक असे आदिवासी गोर गरीब जनतेवर अन्याय अत्याचार चे प्रकरणे एकापाठोपाठ सुरूच आहेत.या प्रकरणी जिवती तालुक्यात अंबेझरी येथे एका आदिवासी मुलीवर बलात्कार झाला त्या अनुषंगाने तहसील कार्यालयावर भिमराव पाटील जुमनाके राजगोंड संरक्षण समिती व मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. देशात बहुजन गोरगरिबांना न्याय मिळत नाही आहे.हे सरकार बहुजनांच्या मतावर राज करीत आहे मात्र त्यांना संरक्षण देण्यात कमी पडत आहे.असा आरोप गजानन जुमणाके यांनी यावेळी व्यक्त केला.तालुक्याच्या बिरसामुंडा चौक ते तहसील कार्यालय असा प्रचंड मोर्चा काढण्यात आला.आधीच तालुक्यातील मुख्य मार्गाचे काम सुरू असून त्यात हा मोर्चा असल्यामुळे एक तास रस्ता जाम झाला होता.मोर्चात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले त्यात नगर पंचायतचे उप नगराध्यक्ष डॉ.अंकुश गोतावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की सरकार बहुजनांवर अत्याचार बलात्कार रोखण्यात अपयशी ठरत आहे.आणि देशात असे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत जर सरकारने आमचं संरक्षण होत नसेल तर आम्हाला हत्यार बाळगण्याचे परवाना देण्यात यावा.यावेळी पांडुरंग जाधव,महेश देवकते,भानुदास जाधव,सुग्रीव गोतावळे,केशव गिरमाजी, कंटू कोटणाके,निशिकांत सोनकांबळे, मंगाम, शंकर सिडाम, भिमराव मडावी,विमल कोडापे,सुरेश कोडापे, डॉ.प्रवीण येरमे तथा आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये