शेतकऱ्यांच्या शेतातील वाट होणार सुखकर!
नारंडा येथून आ. देवराव भोंगळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
शेतकऱ्यांना कोरपना शेतात जाण्यासाठी बारमाही, पक्के व सुलभ रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते” योजनेअंतर्गत आज कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथे विद्युत उपकेंद्र ते सोनुर्ली कडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन करून तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरात भोंगळे यांनी केला.
शेतकरी हा कृषीप्रधान देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पावसाळ्यात शेत शिवारातील खराब पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल आणण्या-नेण्यासाठी तसेच शेतीयोयोगी साहित्य वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. मात्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूलमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नातून आता ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचा आणि दर्जेदार पाणंद रस्ता देण्याचा संकल्प असून पाणंद रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे अधिक सुलभ होईल. तसेच शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची रस्त्यांची समस्या आता कायमची सुटणार आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आज मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजने अंतर्गत कोरपना, जिवती तालुक्यात तर उद्या राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातील शेत पाणंद रस्त्यांचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभमिळवून देण्यासोबतच त्यांना अधिक समृद्ध कसे करता येईल, यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना दिली.
यावेळी राजुरा उपविभागीय अधिकारी बालाजी कदम, नायब तहसीलदार करिष्मा वासेकर, भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोडे, भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलंचेवार, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, न. प. गटनेते सतीश बेतावार, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री आशिष ताजने, भाजपाचे कोरपना शहराध्यक्ष अमोल आसेकर, महिला व बालविकास विभागाच्या कोरपना तालुका प्रकल्प अधिकारी झाडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता मेश्राम, कनिष्ठ अभियंता कुडमेथे, नारंडा ग्रामपंचायत सरपंच अनु ताजने, नगरसेवक मेश्राम, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा स्मिता चिताडे, वनोजा ग्रा. पं. सरपंच दिलीप पाचभाई, जेवरा प्रा. पं. सरपंच नैनेश आत्राम, नारंडा ग्रा. पं. उपसरपंच बाळा पावडे, कढोली ग्रा. पं. उपसरपंच विनोद डोहे, पोलीस पाटील नरेश परसुटकर, प्रवीण हेपट, अशोक झाडे, निखिल भोंगळे, विलास पारखी, साईनाथ तिखट, विवेक वडकर, विठ्ठल जुनघरी, मारोती शेंडे, गजानन भोयर, मनोहर झाडे, कवडू हुलके, अनिल संकुलवार, विठ्ठल लेनगुरे, बंडू काळे, मोहन चौधरी, सुरज खामणकर, धनराज चौधरी, गजानन शेंडे, मारोती पेटकर, अरुण सोनपित्रे, साईनाथ मोहुर्ले, दिलीप शेंडे, शुभम अंदणकर, पंढरी काळे यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष ताजने यांनी केले, तसेच संचालन प्रवीण हेपट व आभार प्रदर्शन पोलीस पाटील नरेश परसूटकर यांनी केले.



