नवीन अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा गडचांदूर येथे संपन्न
200 शिक्षकांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मार्फत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर द्वारा आयोजित पंचायत समिती कोरपना इयत्ता दुसरी ते चौथीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे टप्पेनिहाय प्रशिक्षण सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाले, या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक माननीय संजय गाडगे व केंद्रप्रमुख माननीय पंढरी मुसळे यांच्या हस्ते करण्यात आले ,या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय पंढरी मुसळे केंद्रप्रमुख केंद्र आवाळपूर होते प्रमुख अतिथी म्हणून श्री .संजय गाडगे मुख्याध्यापक,श्री भीमराव कोरडे साधन व्यक्ती ,कु लीना झाडे साधन व्यक्ती कु. मनीषा कुसराम साधन व्यक्ती श्रीमतीसीमा जीवणे साधन व्यक्ती है उपस्थित होते ,
याप्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन करताना माननीय पंढरी मुसळे केंद्रप्रमुख म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात होत असलेले बदल ही काळाची गरज असून त्यांचे स्वागत केले पाहिजे विद्यार्थी केंद्रीय शिक्षण कृती आधारित अध्यापन आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून प्राथमिक शाळा अधिक सक्षम व परिणामकारक बनविण्याचे मोठे आव्हान शिक्षकासमोर आहे नव्या बदलाचा सकारात्मक स्वीकार करून शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले, त्याच प्रकारे यावेळी प्रमुख अतिथी बोलताना श्री संजय गाडगे मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर यांनी आपले मत व्यक्त केले आहे की जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रभावी जीवण मूल्यांचे शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास मराठी शाळा मध्येच होतो असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे कारण मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळते आहे जीवनाचे खरे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतच मिळतात शिक्षकांना अपडेट राहण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना नवीन नवीन ज्ञान मिळत असते असे म्हटले
2026 27 मध्ये शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी तसेच आवश्यक प्रशासकीय शैक्षणिक कार्यवाही याबाबत या प्रशिक्षणाचे समन्वयक श्री विकास भंडारवार यांनी माहिती दिली ,सदर प्रशिक्षणातून नवीन अभ्यासक्रमातील बदल त्यामागील उद्दिष्टे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आणि वर्ग शिक्षणात आवश्यक असलेल्या कृती याविषयी यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले पंचायत समिती कोरपण्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय कल्याण जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीस निश्चितच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या सत्राचे संचालन व श्री.विकास भंडारवार यांनी केले व श्री चंदू कोटनाके यांनी आभार यांनी मानले
इयत्ता दुसरीच्या वर्गाला मार्गदर्शक म्हणून श्री वैद्य सर श्री शिवाने सर श्री गोखले सर श्री सचिन कांबळे सर श्री विठ्ठल आवारी सर श्री संतोष बुच्चे सर यांनी काम पाहिले कर येता तिसरी व चौथी या वर्गाला मार्गदर्शक म्हणून श्री हरी आडे सर श्री ज्ञानेश्वर बुद्धवंत सर श्री अनुप राठोड सर श्री जाधव सर व श्री मिलिंद मुसळे सर श्री सुनील आलोने सर श्री चंदू कोटनाके सर श्री संजय तोडासे सर याने प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन केले.



