ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहरमनिमित्य गोजोलीतील दर्ग्यावर भाविकांची मांदियाळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

मोहरमनिमित्त गोजोली मक्ता येथील गणपती बाबा दर्गा येथे भाविकांनी मनोभावे पूजा केली. बंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता आणि शांतीचे प्रतीक असलेल्या मोहरमच्या दिवशी गोजोली मक्ता येथील दर्ग्यावर भाविकांची मांदियाळी जमली होती. या कार्यक्रमादरम्यान भाविकांना भोजनदान करण्यात आले.

दर्गा कमिटीचे संस्थापक असलेल्या गणपती कोवे महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमासाठी तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक गावातून भक्ताची गर्दी दिसून आली.

 गणपती बाबा दरगाह सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव कोडापे, सचिव अनिल शेडमाके, रमेश शेंडे, प्रकाश मेश्राम, संजय चौधरी, सुधाकर सोयाम यांच्यासह व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये