ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 27 जुन 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे ॲटी नार्कोटिक्स पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन

हिंगणघाट हद्दीतील माऊली पार्क संत तुकडोजी वार्ड येथे रेड केला असता तेथे आरोपी 1) सुजल विनोद कडु, वय 19 वर्ष, रा. तेलंगखडी तहसिल वार्ड हिंगणघाट, 2) प्रज्वल सुनील कडु, वय 23 वर्ष, रा. तेलंगखडी तहसिल वार्ड हिंगणघाट, 3) साहिल रविंद्र मुन, वय 23 वर्ष, रा. सयजा शाळेजवळ सरूळ, तह. देवळी ह.मु. म्हाळगी नगर हुडकेश्वर रोड नागपुर, 4) मृणाल प्रशांत गोडे, वय 23 वर्ष, रा. आई माई मंदिर जवळ रोहनखेडा, तह. हिंगणघाट ह.मु. म्हाळगी नगर हुडकेश्वर रोड नागपुर, 5) जिवा विजु जुनगडे, वय 22 वर्ष, रा. पाण्याचे टाकि जवळ शिरूळ, तह. हिंगणघाट, ह.मु. म्हाळगी नगर हुडकेश्वर रोड नागपुर, असे हजर मिळून आले असून, पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गांजा अंमली पदार्थ मिळून आला असून, सदर गांजाचा माल हा आरोपी सुजल कडु व प्रज्वल कडु यांचे मालकिचा असुन, तो साहिल मुन, मृणाल गोडे, जिवा जुनगडे यांनी पुरवठा केला असुन, त्यांनी सदर गांजाचा माल त्यांचा रूम पार्टनर 6) विशाल राऊत रा. म्हाळगी नगर हुडकेश्वर रोड नागपुर याचेपासुन आणल्याचे सांगितले. तरी नमुद आरोपी हे संगणमताने गांजा मालाची तस्करी करून विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीतांचे ताब्यातुन 01 किलो 75 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, गांजा मालाची वाहतूक करण्याकरीता वापरलेली एक लालसर कथीया रंगाची हुंडई असेंट कार क्र. एम.एच. 43 एन. 6528 व पाच मोबाईलसह जु.किं. 3,09,845 रू चा मुद्देमाल जप्त करून एकूण 06 आरोपींविरुद्ध पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सिनूकुमार बानोत, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये