दारू पिवुन दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या 1 मालवाहु चालक व 1 वाहन जप्त करुन कार्यवाही
विलास पाटील पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ ॲनीलाइझर सह संपुर्ण वर्धा जिल्हयात दि. 27/06/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 27/06/2026 रोजी वर्धा शहरात मार्शल पेट्रोलींग दरम्याण पोलीस पोहवा 814 / सैयद, पोहवा / 1265 मुकेश राऊत, पोहवा / 1492 चंद्रकांत तपासे, नापोशि/170 आरीफ खान, पोशि / 163 दिलीप कामडी यांनी बसस्टॉप येथे चेक केले असता नमुद 1) वाहन चालक कमांक MH 32 AJ 6552 मालवाहु चा चालक नामे संकेत ज्ञानेश्वरराव भोयर, वय 27 वर्ष रा. नागापुर जि. वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ ॲनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 326.8 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळुन आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला
वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह च्या एकुण 163 केसेस, एकुण लायसन्स निलंबन प्रस्ताव 57 पाठविण्यात आले, एकुण 129/177 हेल्मेटच्या 2249 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66(1)/192(अ) एकुण 99 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा श पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर टुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.
तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा…



