ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. कालीदास अहीर स्मृतीदिनी १२ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर आयोजित

चांदा ब्लास्ट

सामाजिक कार्य, युवक संघठन तसेच विविध क्रीडा प्रकारात रुची ठेवून कीडास्पर्धांचे कमल स्पोर्टींग क्लबद्वारा आयोजन करीत युवकांपुढे आदर्श ठेवणारे धडाडीचे व्यक्तीत्व स्व. कालीदास गं. अहीर यांच्या स्मृतीनिमित्त दि. 12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 वाजता स्थानिक जैन भवन, चंद्रपूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

कमल स्पोर्टींग क्लब चंद्रपूर व मित्र परिवाराच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून कालिदास स्मृतीदिनी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन राष्ट्रीय कार्यात योगदान देण्यात येत आहे. यंदाच्या रक्तदान शिबीरास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आम. किशोर जोरगेवार, डॉ. अशोक जिवतोडे, विजय राऊत, खुशाल बोंडे, प्रमोद कडु, राजेंद्र गांधी, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, अंजली घोटेकर, अनिल फुलझेले, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर चे अधिष्ठाता डॉ. फुलपाटील, आयएमए चे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, डॉ. एम.जे. खान, डॉ. सैनानी, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. किरण देशपांडे, डॉ. गाडेगोणे, डॉ. दुद्दलवार, डॉ. अजय मेहरा, डॉ. मंगेश गुलवाडे व अन्य प्रतिष्ठीत डॉक्टर तसेच भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या या रक्तदान शिबीरास युवक, युवती व स्नेहीजणांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कमल स्पोर्टींग क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये