ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरी नाही हे हेरून अज्ञात चोरट्याने केले 52 हजाराचे दागिने लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या नोकरदाराच्या घरी कोणी नाही या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने 52 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी चोरट्याविरुद्ध दिनांक 26 ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक शिवाजीनगर येथे राहणाऱ्या फिर्यादी सुनील फकीरबा देशमुख हे आपल्या कुटुंबासह घराचा दरवाजा ओढून शहरामध्ये सुरू असणाऱ्या यात्रेमध्ये दिनांक 18 च्या सकाळी नऊ वाजे दरम्यान गेले होते यात्रेमधून दुपारी परत आल्यानंतर घरातील कपाटामध्ये असलेले साहित्य पलंगावर अस्ताव्यस्त पडलेले दिसले यावरून त्यांनी घरातील कपाटातील दागिन्याचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही.

त्यामध्ये कानातील झुंबर सहा ग्राम किंमत वीस हजार रुपये 2 सोन्याची अंगठी चार ग्राम पंधरा हजार रुपये 3 सोन्याची पाच ग्रामची अंगठी 17 हजार रुपये असे सोन्याचे दागिने त्यांना आढळून आले नाही त्यांनी दिनांक 26 ला देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई करत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये