रुग्ण कल्याण समितीवर अमोल असेकर यांची सदस्यपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपणा :_ ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर भाजपा शहराध्यक्ष अमोल आसेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची ही नियुक्ती करण्यात आली असून, या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या निवडीबद्दल अमोल आसेकर यांनी आमदार देवरावदादा भोंगळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा, आवश्यक सोयी-सुविधा तसेच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांच्या समस्या सोडविणे आणि रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी अमोल आसेकर यांच्या निवडीबद्दल निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हेमचंद्र किन्नाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक जाधव डॉ.आकाश जीवने यांनी त्यांच्या निवडीबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.



