ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वन्यजीव सप्ताहानिमित्त भद्रावती वनपरीक्षेत्रात विविध उपक्रम

वन्यजीव वाचवा, पर्यावरण वाचवाचा दिला संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ वन्यजीव संरक्षण व संवर्धनासह पर्यावरण आणि जैवविविधतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने भद्रावती वनपरीक्षेत्राच्या वतीने वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

सप्ताहादरम्यान शहर व ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व, जैवविविधता, अन्नसाखळी तसेच पर्यावरणाचा समतोल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती देत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. ‘वन्यजीव वाचवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश यावेळी देण्यात आला.

वन्यप्राण्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी वनपरिसरात वनराई बंधारे बांधण्यात आले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भद्रावती शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वन, वन्यजीव, अन्नसाखळी आणि पर्यावरणीय समतोल याबाबत जनजागृती करण्यात आली.

हा सप्ताह विभागीय वनाधिकारी तलमले, सहाय्यक वनसंरक्षक तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या नियोजनानुसार राबविण्यात आला. क्षेत्र सहाय्यक जे. ई. देवगडे, जे. के. लोणकर, व्ही. आर. ठाकरे यांच्यासह सर्व वनरक्षक, वनमजूर तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सप्ताहातील विविध उपक्रमांत सहभाग घेतला.

वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असा संदेश या सप्ताहाच्या माध्यमातून देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये