ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डोंगरवाटेचा प्रवास होणार सुकर : स्वातंत्र्यानंतर ७९ वर्षांनी डोंगरगावत दिसली बस

आमदार देवराव भोंगळेंची तातडीची दखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ स्वातंत्र्य मिळून तब्बल ७९ वर्षे उलटली, मात्र गोंडपिपरी तालुक्यातील जंगल परिसरालगत असलेल्या डोंगरगावला अद्याप नियमित बससेवा मिळाली नव्हती.परिणामी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता.विशेषतः धाबा व गोंडपिपरी येथे उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या ४० ते ५० विद्यार्थ्यांना दररोज जंगलवाटेने तब्बल चार किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता. परिसरात वन्यप्राण्यांसह वाघाचा वावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डोंगरगावातील शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थांनी सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी गोंडपिपरी आगार गाठून बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. ‘जंगलवाटेचा प्रवास थांबवा, डोंगरगावला बस द्या’ असा आक्रोश ग्रामस्थांनी केला होता.

या मागणीची दखल घेत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी बुधवारी, दि. ७ ऑक्टोबर रोजी स्वतः गोंडपिपरी येथे येत डोंगरगाव-मक्ता-सुकवाशी मार्गाने बसने प्रवास केला. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच दोन दिवसांत डोंगरगावसाठी बससेवा सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. यावेळी वाहतूक निरीक्षक राज वैद्य उपस्थित होते.

गावाच्या रस्त्यावर पहिल्यांदाच बस धावताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ७९ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामस्थांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये