शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रूपापेठ येथे शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा जल्लोषात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील रुपापेठ येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आयोजन करण्यात आला. नवीन वर्षाच्या प्रारंभ निमित्य आयोजित या सोहळ्याची सुरुवात गावातून प्रभात फेरी काढून करण्यात आली. त्या करिता उद्घाटक म्हणून माननीय.श्री आर एस बोंगिरवार(स.प्र.अ. शिक्षण चंद्रपुर) हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष(श्री. पुरुषोत्तम मडावी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष )व उपाध्यक्ष सगुणा ताई किन्नाके तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अवतिका ताई आत्राम सरपंच रुपापेठ, विनोद तोडासे उपसरपंच, प्रतीक्षा ताई आडे पोलिस पाटील रुपापेठ, श्री रामदास मेश्राम तंटामुक्ती अध्यक्ष रुपापेठ, मनोज भाऊ तुमराम ग्रामपंचायत सदस्य आदिवासी कार्यकर्ता,श्री भारतभाऊ आत्राम आदिवासी समाज सेवक, श्री प्रमोद भाऊ कोडापे आदिवासी कार्यकर्ता गावातील व परिसरातील आदिवासी लोक प्रतिनिधी उपस्थित होते.
माननीय सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांचा हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व शालेय पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.तसेच माध्यमिक शालांत परिक्षा (SSC) 2026 ला गुणानुक्रमे प्रथम, द्वितिय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व इयत्ता 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करणे साठी माननीय मुख्याधापक श्री के. ए .मडावी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी.



