सावित्रीबाई फुले विद्यालयात सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर तसेच संजय गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, पेल्लोरा यांच्या संयुक्त विद्यमाने नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ भव्य सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे संपन्न झाला.
या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका/प्राचार्या सौ. वर्षा बालाजी फुटाणे मॅडम, प्रा. श्रीधर कवडूजी लढी सर, संजय गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेल्लोरा, प्रा. विजय गोपीनाथ मुप्पीडवार सर आणि श्री. सुरेश उद्धवराव पाटील सर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संचालक मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात प्रास्ताविक प्राचार्य श्री. संजय गाडगे तर प्रा. दिनकर झाडे व प्रा. वामन राजूरकर यांनी सत्कारमूर्तीविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारमूर्तींनी सत्काराला उत्तर देताना संस्थेने त्यांच्या विकासासाठी व त्यांनी शाळेच्या विकासात केलेल्या उपयुक्त योगदानाबाबत सविस्तर विवेचन केले.
उपस्थित संचालक मंडळाच्या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त शिक्षकांनी संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कार्यनिष्ठा, शिस्त, समर्पण व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमाची आठवण करून देत त्यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव तथा संचालक सदस्य, पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, प्रा. सातपुते सर, प्रा. मेहरकुरे सर, प्रा. कोल्हे मॅडम, कु. चांदेकर मॅडम, करन लोणारे, बोबडे सर, मस्के सर, कु. शेंडे मॅडम, कु. उमरे मॅडम, आत्राम सर, किन्नाके सर,आडे सर, वाघळे सर, लीलाधर मत्ते, कु. प्रियांका उरकुडे, संकल्प भसारकर, शशिकांत चन्ने यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर तसेच संजय गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, पेल्लोरा येथील विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बोळे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन किसान कोडापे यांनी केले



