ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचे त्वरित आयोजन करा

गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गोंडवाना विद्यापीठाच्या व संलग्नित सर्व महाविद्यालयीन शिक्षकांच्या कला गुणाचा विकास व्हावा आणि त्यांना त्यांचे कौशल्य तथा सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळावी याकरिता मागील वर्षी गोंडवाना विद्यापीठ असोसिएशनच्या पुढाकाराने विद्यापीठाद्वारे शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचे प्रथमच आयोजन करण्यात आलेले होते परंतु अत्यंत उत्साहाच्या व खेळन्याच्या वातावरणात सुरू झालेले सदर क्रीडा व कला महोत्सव विद्यापीठाने पूर्ण केलेले नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व कला महोत्सव घेण्याबाबत विद्यापीठ ज्याप्रमाणे उत्साह व तत्परता दाखवते तेवढीच उदासीनता शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा घेताना विद्यापीठाची दिसून येते हे खेदाची बाब आहे.

मागील वर्षी शिक्षक क्रीडा व कला महोत्सव आयोजित करण्याकरिता गठित समितीने नियोजन व विद्यापीठाने निधी मंजूर केला असताना देखील शिक्षक क्रीडा व कला महोत्सव अपूर्ण का घेण्यात आले याबाबत चौकशी करून उचित कारवाई करावी व यावर्षी मागील वर्षाच्या सर्व क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश करून विद्यापीठाद्वारे शिक्षक क्रीडा व कला महोत्सव 2024 चे लवकरात लवकर आयोजन करून गोंडवांना विद्यापीठाच्या व संलग्नित सर्व महाविद्यालयीन शिक्षकांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना आपले कला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त करून द्यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोरलावार यांनी कुलगुरू यांचे कडे मागणी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये