ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आम आदमी पार्टीच्या देऊळगाव राजा शहराध्यक्षपदी मंगेश तिडके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आम आदमी पार्टी च्या देऊळगाव राजा शहर अध्यक्षपदी पत्रकार मंगेश तिडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे

     संपूर्ण देशामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी जोर धरत आहे. या पार्टीचे ध्येयधोरण सर्वसामान्य जनतेसाठी काम करणे हे आहे भ्रष्टाचार मुक्त शासन हा संपूर्ण देशासह गावागावात पोहोचला पाहिजे यासाठी आम आदमी पार्टी काम करत आहेत, संपूर्ण देशामध्ये दिल्ली आणि पंजाब येथे जनतेने विश्वास दाखवत त्यांच्या हातात सत्ता दिली आहे ,शहर आणि ग्राम पातळीमध्ये केजरीवाल यांची विचारधारा पोहोचवण्यासाठी युवक वर्ग पुढे येत आहे देऊळगाव राजा शहरातील धडाडीचे कार्यकर्ते मंगेश तिडके यांचे सामाजिक कार्य बघता आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन नांदुरकर यांनी मंगेश तिडके यांना देऊळगाव राजा शहर अध्यक्षपदी नियुक्त केले आहे पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करणे व शहरातील संघटन मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व संघटना वाढवावी असे या पत्रात नमूद केले आहे.

मंगेश तिडके यांची आम आदमी पार्टी शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शहरातील विविध समस्यांना आम आदमी पार्टीच्या माध्यमातून वाचा फोडेल आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे नियुक्तीनंतर मंगेश तिडके यांनी प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये