ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्याला गारपिटीने झोडपले

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ; नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

देऊळगाव राजा तालुक्यात 26 फेब्रुवारी ला मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत.

तालुक्यातील सिंनगावं जहांगीर, पांगरी माळी, डोईफोडे वाडी,खल्ल्याळ गव्हाण, व इतर भागात सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीने शेतपिकांचे व शेड नेट चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनने तातडीने पंचनामे करून,शासनाकडे पाठवून नुकसान भरपाई त्वरीत दयावी अशी मागणी सिंनगावं च्या सरपंच सुनीता गजानन डोईफोडे यांनी प्रशासन कडे केली आहे.

यापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते, शासनाकडून मंजूर करण्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करून आधार द्यावा अशी सुद्धा मागणी सरपंच सुनीता डोईफोडे यांनी केली आहे,

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी आज सकाळी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली, शासनाद्वारे त्वरित मदत मिळवुन देण्यात येईल असे आश्वासन दिले, याप्रसंगी सरपंच सुनीता डोईफोडे व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये