ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मद्यप्राशन करून मोटारसायकलस्वारास धडक

सदर कृत्य सोशल मिडीयावर प्रसारीत ; चौकशीअंती होणार कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २२.०२.२०२४ रोजी वर्धा जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार पुजा गिरडकर व पोलीस अंमलदार मनोज सुर्यवंशी असे दोघेहि गणवेषात असतांना यातील महिला पोलीस अंमलदार यांचे ताब्यातील Suzuki Wagon R चारचाकी वाहन क्र. एम.एच.-४८/पि.-०८६४ ने जात असतांना महिला पोलीस अंमलदार यांनी मद्यप्राशन करुन त्यांचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन त्यांचे समोर प्रवास करणारे मोटर सायकल क्र. एम.एच.-३२/ए.सी.-२६७८ यास धडक मारुन मोटर सायकल चालक व त्यांचे मागे बसुन असलेल्या इसमास जखमी केले.

त्यावरुन जखमी यांनी सदर महिला पोलीस अंमलदार यांना विचारपूस केली असता सदर महिला कर्मचारी ही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे त्यांना दिसुन आले तसेच त्यांचे मागील सिटवर यातील नमुद पोलीस अंमलदार हे मद्यधुंद अवस्थेत झोपुन असल्याचे दिसुन आला. नागरीकांनी त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ केला असुन सदर व्हिडीओ सोशल मिडिया व वृत्तपत्रात प्रसारीत झाला. त्यावरुन यातील जखमी यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क्र. १५१/२०२४ कलम २७९, ३३७ भा.दं. वि. सहकलम १८४ मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर दोन्ही पोलीस अंमलदार यांनी वरील प्रमाणे केलेले कृत्य सोशल मिडीयावर प्रसारीत झाले असुन वर्धा जिल्हा पोलीस चे वतीने वरील दोन्ही पोलीस अंमलदार यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. सदर प्राथमीक चौकशी अहवाल आज रोजी प्राप्त झाला असुन सदर अहवालामध्ये वरील दोन्ही पोलीस अंमलदार दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने चौकशी अंती वरील नमुद दोन्ही पोलीस अंमलदार यांना निलंबीत करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये