महात्मा गांधी विद्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त भाषण स्पर्धाचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे भारतीय संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यात वक्तृत्वकौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. साईनाथ मेश्राम सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री. दत्तू येडमे सर, तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती भारती घोंगे मॅडम उपस्थित होत्या.
या भाषण स्पर्धेचे आयोजन श्री. देवराव जाधव सर व श्री. नरसिंह पांचाळ सर यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण श्री. रवींद्र चौधरी व श्रीमती वनिता पेंदाम मॅडम यांनी केले. उच्च प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधान निर्मितीचा इतिहास, संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये, लोकशाही मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अशा विविध विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी ‘ग’ ची विद्यार्थिनी कु. मृणाल कौरासे हिने अतिशय सुंदर पद्धतीने केले, तर आभारप्रदर्शन इयत्ता आठवी ‘क’ ची विद्यार्थिनी कु. कोमल पवार हिने केले.
भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा जागर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली.



