ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वच्छता दूत परेश भाऊ तावडे यांचा लिंगायत देवांग समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे भव्य सत्कार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :_ लिंगायत देवांग समाज बहुउद्देशीय संस्था, सावली (रजिस्टर नंबर 19/2011 (चं.)) यांच्या वतीने समाजसेवा व स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे स्वच्छता दूत श्री. परेश भाऊ तावडे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिलजी मुच्छलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत परेश भाऊ तावडे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बालू भाऊ जंगावर, सोनाली कोंडकावार, संगीता जंगावर, पंकज चिलंगवार, राकेश कोंडकावार, सुनील मुच्छिलवार, प्राची जंगवार, दुर्गा कोंडकावार, नरेंद्र कस्तुरे, संजय श्रीरामे, साईनाथ भंडारे, संतोष कस्तुरे, जिजाबाई कस्तुरे, पल्लवी गुंडमवार, तेजश्री कोंडकावार तसेच संस्थेचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वच्छता ही केवळ एक जबाबदारी नसून ती समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आहे. स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवून प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या परेश भाऊ तावडे यांच्या कार्याचे यावेळी सर्व उपस्थितांनी कौतुक केले. त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हीच संस्थेची सामाजिक बांधिलकी असून, अशा सत्कार सोहळ्यांमुळे समाजातील इतरांनाही समाजसेवेची प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

समाजसेवकांचा सन्मान, समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा अभिमान!

— लिंगायत देवांग समाज बहुउद्देशीय संस्था, सावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये