ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पात्र असूनही घरकुल योजनेपासून डावलल्याने पंचायत समिती समोर बेमुदत संप

तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भिक मांगो आंदोलन मध्ये सहभागी होत दिला पाठीबा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली: पात्र असूनही घरकुलापासून वंचित ठेवले असा आरोप करीत घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी जीबगाव येथील लाभार्थ्यांनी पंचायत समितीसमोर २२ फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी भिक मांगो आंदोलन करण्यात आले त्यावेळी संतोष तगडपल्लीवार माजी सभापती जि.प. चद्रपुर,प्रकाश गड्डमवार अध्यक्ष श्रावण बाळ निराधार योजना सावली,सतीश बोम्मावार भाजपा महामंत्री तथा नगरसेवक सावली,विलास यासलवार माजी नगराध्यक्ष,रविंद्र बोलीवार उपसभापती,रोशन बोरकर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आनंदराव ठिकरे उसेगांव,इत्यादी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भिक मांगो आंदोलना मध्ये सहभागी होत पाठिंबा दिला आणि आंदोलन कर्त्या कुटुंबासोबत चर्चा केली. मात्र घरकुल मिळेपर्यंत आणी सरपंच सचिव अधिकारी यांचेवर कार्यवाही होई पर्यंत आंदोलन सुरु ठेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. जीबगाव येथील दिलीप अशोक पाल व विलास उरकुडा नागापुरे यांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नाही. अग्रक्रमाने लाभ न देता वा कोणतीही घरकुलांची चौकशी न करता ग्रामपंचायत जीबगाव येथील सरपंच व सचिव यांनी संगमताने आम्ही पात्र असताना डावलले असून अपात्र लाभार्थ्यांना पात्र दाखविण्यात आल्याचा आरोप करीत सावली पंचायत समितीसमोर कुटुंबासह आंदोलन सुरु आहे.आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून समजविण्याचा प्रयत्न केला तरी मात्र आंदोलन मागे घेणार नाही,जोपर्यंत सचिव ,अधिकारी यांचेवर कार्यवाही करुन आमची मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.त्यावेळी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे सांगितले,पण आंदोलक आपली भुमिकेवर ठांब असल्याने,यासंदर्भात वरीष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करुन आपला आंदोलन पाठीबा जाहिर करतोय आणी प्रश्न निकाली निघेपर्यंत आपल्या परीवारांच्या सोबत राहु असे आश्वासन केले आहे.लवकर प्रश्न निकाली काढण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.

पात्र लाभार्थ्यांची यादी नियमानुसार लावलेली आहे. आंदोलनकर्त्या कुटुंबाने संयम बाळगावा.येणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये संबंधित कुटुंबाला योजनेचा लाभ दिला जाईल.
मधुकरजी वासनिक,गट विकास अधिकारी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये