ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.शाळा लालगुडा येथे ‘सेल्फी विथ सक्सेस’मुळे विद्यार्थ्यांत वाढला उत्साह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

स्वयंअध्ययनाद्वारे शिकून विद्यार्थ्यांना आनंदाची अनुभूती देणारा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा ‘सेल्फी विथ सक्सेस’ हा उपक्रम जि. प. प्राथमिक शाळा लालगुडा, पंचायत समिती कोरपना जि. चंद्रपूर येथे सुरू करण्यात आला. विविध प्रकारच्या आव्हाना द्वारे विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वाढविणे, मूलभूत कौशल्याचा विकास करणे व तसेच भविष्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे ,आदी उपक्रम या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत आहेत.

       ‘सेल्फी विथ सक्सेस’उपक्रमामध्ये विविध आव्हानात्मक कृतीच्या माध्यमातून शिकण्याची प्रक्रिया शाळेत राबवून मुलांना आव्हाने दिली जातात. जास्त आव्हाने पूर्ण करणाऱ्या मुलांसोबत सेल्फी घेतली जाते. शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी विद्यार्थ्यांना पाच मिनिटात जास्तीत जास्त जोड शब्द लिहिणे, यमक जुळणारे शब्द लिहिणे, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द लिहिणे, कमी वेळात दिलेल्या उताऱ्यावर जास्तीत जास्त प्रश्न तयार करणे, इंग्रजी मुळाक्षरांपासून जास्तीत जास्त शब्द सांगणे व लिहिणे, दिलेल्या संख्यांची बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार व भागाकार करणे अशी आव्हाने दिली होती. ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आव्हान कमी वेळेत पूर्ण केले त्या विद्यार्थ्या सोबत सेल्फी काढण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांना एक वेगळा आनंद मिळत आहे .त्यामुळे अभ्यास करण्यासाठी ते स्वयंप्रेरित होत आहेत. तसेच आपली सेल्फी यावी म्हणून जास्तीत जास्त आव्हाने पूर्ण करीत आहेत.

         सदर उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये