ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त घुग्घूसमध्ये तीन दिवसीय धार्मिक सोहळा

साई पालखी, मूर्ती स्थापना व महाप्रसादाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

घुग्घूस : श्री साईबाबा मंदिर सेवा समिती, अमराई वॉर्ड क्र. १, घुग्घूस यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन समितीने साईभक्तांना केले आहे.

समितीच्या माहितीनुसार, दि. २७ जुलै २०२६ (सोमवार) रोजी सकाळी १०.०० वाजता श्री साईबाबांच्या मूर्ती स्थापनेने कार्यक्रमांची सुरुवात होईल. त्यानंतर दि. २९ जुलै २०२६ (बुधवार) रोजी सायंकाळी ५.०० वाजता भव्य श्री साई पालखी सोहळा काढण्यात येणार असून, यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

महोत्सवाचा समारोप दि. ३० जुलै २०२६ (गुरुवार) रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाआरती व महाप्रसाद वितरणाने होणार आहे. श्री साईबाबांच्या कृपेने आयोजित या गुरुपौर्णिमा महोत्सवात सर्व साईभक्तांनी व नागरिकांनी उपस्थित राहून साईबाबांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री साईबाबा मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये