अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सच्या CSR विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सच्या CSR विभागातर्फे सन 2025-26 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या महात्मा गांधी विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, स्व. भाऊराव चटप आश्रम स्कूल आणि आदर्श हिंदी विद्यालय येथील एकूण 96 गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे तसेच अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सचे युनिट प्रमुख अंकुर अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना त्यांनी भविष्यातही कठोर परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तेच्या बळावर मोठी उद्दिष्टे गाठण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सचा CSR विभाग परिसरातील शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माणिकगढचे टेक्निकल हेड असित पारुई , माईन्स हेड गजेंद्र सिंग, फायनान्स हेड रोहित गुप्ता व ई आर हेड नवीन कौशिक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्तविक ई आर हेड नवीन कौशिक, तर संचालन सचिन गोवारदीपे व आभार पदर्शन सी एस आर हेड शांतनू आकाश यांनी केलेत.
कर्यक्रमाची वारकरी भजन, स्वागत गीत, व पांडुरंगाची मूर्ती तसेच समय पारखी या विध्यार्थ्यांच्या भाषणाने शोभा वाढवली.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात माणिकगड चे वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत यांचे मोलाचे मार्गदर्शन होते तर सी एस आर चे संगीत चांदेकर व सोनाली ठाकोरे व प्रशासन विभागाचे मानस बेहरा, सौरभ गौतम, विजय सिंग व अभिषेक सिंग यांची महत्वाची भूमिका होती.



