ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित गडचांदूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दिल्ली येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ला चा निषेध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते, त्यानुसार गडचांदूर येथे जिल्हा उपाध्यक्ष दिव्यकुमार बोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचांदूर बंद चे आवाहन करण्यात आले होते, स्थानिक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन सहकार्य केले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर निषेध सभा दिव्य कुमार बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, बी जे पी सरकारच्या काळात वारंवार पेपर लीक होणे, म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, त्यामुळे नैतिक जबाबदार स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली, यावेळी भारतीय बौद्ध महासभा चे उपाध्यक्ष बादल चांदेकर, महिला आघाडी च्या जिल्हा सदस्य बबिता वाघमारे, दीपक शेट्टी, आशाताई भंडारे यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला, संचालन व आभार प्रदर्शन अमोल निरंजने यांनी केले, या आंदोलनात शरद बोरकर, राहुल बोरकर, अनिल सूर्यतळ , धनराज चांदेकर, पारेकर सर, आकाश पाझारे , प्रेम वानखडे, शुद्धोधन खैरे, सिद्धार्थ कातकर , सविता वाघमारे, ज्योत्स्ना तोडे, सुजाता वाघमारे, जयाताई खैरे, सीमा खैरे, मीरा खैरे, वनकर मॅडम, कांचन वाघमारे, रियांशु तोडे, सक्षम खैरे, संघर्ष वाघमारे, सुजाता गावंडे, सुवर्णा भगत, आरती वानखडे, तन्वी गावंडे, शारदा थेरे , हिमांशी वाघमारे व इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये