Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कोरपण्यातील तेरा गावांना हवा महसूल गावाचा दर्जा 

विकास कामात अडचणी ; अन्य गावावर रहावे लागते विसंबून 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – तालुक्यातील अनेक गावांना महसूल गावाचा दर्जा नाही. त्यामुळे या गावाच्या सर्वांगीण विकासात बाधा येत आहे. यादृष्टीने या गावांना महसूल गावाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

कोरपना तालुक्यात ११३ गावाचा समावेश आहे. यामध्ये १०१ आबादी गावे, १२ रीठी गावाचा समावेश आहे. परंतु याव्यतिरिक्त बेलगांव ग्रामपंचायत मधील रामपूर ,येरगव्हाण ग्रामपंचायत तील कमलापूर या दोन गावासह पिपरडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिपडागुडा, कोठोडा बूज ग्राम पंचायत मध्ये समाविष्ट असलेले पांडवगुडा, येरगव्हाण ग्राम पंचायत मधील कोलामगुडा खैरगाव ग्रामपंचायत तील भरकीगुडा, कातलाबोडी ग्रामपंचायत मधील पारधीगुडा, चनई बूज ग्राम पंचायत क्षेत्रातील भोईगुडा, जेवरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेले तुकडोजीनगर , बेलगांव ग्राम पंचायत तील पाकडहिरा, जामगाव, खिर्डी ग्रामपंचायत तील निजामगोंदी,कढोली खू ग्राम पंचायत तील मायकलपुर या अकरा गुड्याच्या स्वरूपातील गावांना महसूल गावाचा अद्याप दर्जा प्राप्त झाला नाही. त्यामुळे या गावांना लगतच्या इतर गाव व ग्रामपंचायतीवर विसंबून राहावे लागत आहे. महसूल विभागाकडून रामपूर, कमलापूर, पिपडागुडा गावांना महसूल गावाचा दर्जा देण्यात यावा यासंदर्भात शासन दरबारी प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आला आहे. परंतु यावर अनेक वर्ष लोटून ही कुठलीही सकारात्मक पावले उचलण्यात आली नाही. यामुळे या गावांच्या सर्वांगिन विकासाला खीळ बसली आहे.यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

चुकीची रचना गावांची अडचण

कोरपना तालुक्यातील कारगाव बूज हे गाव जिवती तालुक्यातील धनकदेवी ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे. नवेगाव गावाची ग्रामपंचायत राजुरा तालुक्यातील गावात आहे.तर कोरपण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले सिंगारपठार गाव फेर रचनेत जिवती तालुक्यात समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांना प्रशासकीय कामाकाजात मोठ्या अडचणी येत आहे. हीच स्थिती तालुक्यातील बऱ्याच अन्य गावाची वन, पोलीस स्टेशन, हद्दीची सुद्धा आहे. यावर राजुरा, कोरपना, जिवती या तिन्ही तालुक्याचा रचनात्मक आढावा घेऊन हा वनवास संपवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये