ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू पोलीसांनी 24 तासात लुटपाट करणारे आरोपीला केले जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 22/06/2026 रोजी फिर्यादी नामे वासुदेव मारोतराव घवघवे वय 67 वर्षे रा. विकास चौक सेलू यांनी पोलीस स्टेशन सेलू येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिली. ते आठोडी बाजार येथे लहाण पुलावरुन बँकचे कलेशन करुन सायकलने घरी जात असताना दोन अज्ञात आरोपींनी मोटार सायकलने येवुन त्यांना विकास चौक, सेलू येथील नदिचे पुलावर थांबवुन त्यांचे हातातील लाल रंगाची बँग ज्यात त्यांचे मोबाईल व बँकेचे कागद पत्र होते ती हिसकावुन पळुन गेले. अश्या फिर्यादीचे तक्रारी वरुन पो.स्टे. सेलू येथे अप क्र. 463/2026 कलम 304,3 (5) बि.एन.एस. अन्वये दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधीकारी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेलू येथील ठाणेदार व गुन्हे प्रगटी करण पथकाने गोपनीय माहिती वरुन अज्ञात आरोपीचा शोध घेने कामी रवाना झाले. त्यानी 1) मारोती हिरालाल बानोत वय 29 वर्षे व 2) दानीश रफीक शेख वय 30 वर्षे दोन्ही रा. जोशी नगर ता. सेलू जि. वर्धा. याना ताब्यात घेवुन पोलीसाचा हिसका दाखवीत विचारपुस केली असता. त्यांनी आज दि. 23/6/2026 रोजी गुन्हाची कबुली दिली. त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली मोटर सायकल ही सेलू पोलीसांनी जप्त केली असुन सदरचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणुन आरोपींना अटक केली आहे. पोलीसांचे सदरचे तत्पर कार्यवाही मुळे सेलू पोलीसांचे परीसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, श्री सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेलू चे नवनियुक्त ठाणेदार पंकज वाघोडे व डि.बी. पथकाचे अंमलदार मनोहर मुडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाडखेडे व विनायक गोडे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये