ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी पोलीसांची अवैद्य धं‌द्यावर धाड व कार्यवाहीचे सत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 22/06/2026 रोजी पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले पो.हवा. गणेश बावणे यांना मुखबीर कडुन माहीती प्राप्त झाली की, अडेगाव येथे राहणारी सौ सुवर्णा सिडाम ही त्यांचे साथीदारासह मौजा चिंचाळा व अडेगाव शिवारात देशी दारू बाळगुन त्याची विक्री करीत आहे.

अशा माहीती वरून ठाणेदार श्री संदीप कापडे साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाप्रमाने पो स्टाफ पो उपनि. अश्वीन गजभीये पोहवा गणेश बावणे ब क्र 906, पोहवा गजानन महाकाळकर ब क्र 880, पो.शि. अमित पटले ब क्र 125 सफौ सतीश दरवरे, नापोका दुर्गेश बानते, ड्रा. फिरोज पठाण असे अडेगाव ते गौळ मार्गानी गेलो असता तेथे जयदेव बापुराव डुकरे वय 60 वर्ष रा. चिंचाळा ता. देवळी जि. वर्धा हा संशयास्पद रीतिने मीळुन आला. त्याला सविस्तर विचारपुस केली असता त्याने सांगितले मी सुवर्णा सिडाम व लक्ष्मन मारोतराव सिडाम यांचे मालकीची देशी दारू विक्री करतो व सदरची दारू रोडवर व अडेगाव गावात आणतो व बाकी देशी दारूच्या मालाची साठवणुक ही रविंद्र दौलतकार यांचे शेतात लपवुन कडाळुमध्ये ठेवलेली आहे.

त्यावरुन ठाणेदार श्री संदीप कापडे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाप्रमाणे व पोलीस स्टाफ सह रविंद्र दौलतकार यांचे शेतात जावुन पाहाणी केली असता, जनावरां करीता पेरलेल्या हिरवे कडाळुमध्ये 12 खरड्याच्या खोक्यामध्ये 511 देशी दारूने भरलेल्या 180 एम एल च्या गोवा संत्रा नं. 1 कंपनीच्या शिश्या प्रति शिशि 200 रु. प्रमाणे 102,200 रु.चा माल मिळुन आल्याने मौक्काजप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे. व आरोपी विरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये प्रभावी कार्यवाही करण्यात आली अटकेतील आरोपी नामे जयदेव बापुराव डुकरे वय 60 वर्ष रा.चिंचाळा ता. देवळी जि. वर्धा यांस विद्यमान न्यायालयातुन पीसीआर मिळविण्याची प्रक्रीया सुरु असुन उर्वरित आरोपीस अटक करणे आहे. या कार्यवाहीवरुन परिसरातील अवैद्यव्यवसाय करणारे लोकांचे धाबे दणानले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक साहेब श्री सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस. अधीक्षक श्री सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती वंदाना कारखेले मॅडम यांचे निर्देशाप्रमाने देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे व देवळी पोलीसांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये