पोलीस स्टेशन देवळीच्या वतीने देवळी शहरात रस्ते वाहतूक सुरक्षा व अंमली पदार्थ विरोध बाबत काढण्यात आली जनजागृती रैली
सोबत करण्यात आले हेल्मेट वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
रस्ते विषयक अपघाताचे प्रमाण वाढले असुन त्यामध्ये जिवित हाणी व विकलांगता चे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. रस्ते अपघाताचे प्रमाण 10 टक्के ने कमी करण्याबाबत मा. पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सुचना केलेल्या आहेत, त्याकरीता सर्व स्तरावर रस्ते सुरक्षा, वाहतुक नियमन या बाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. वाढते अपघाताबाबतची जनजागृती व ड्रग्ज फ्री वर्धा करण्याकरीता पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल वर्धा व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे वर्धा यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना प्रमाणे पोलीस स्टेशन देवळी येथे आज वाहतुक सुरक्षा, वाहतुक नियम व ड्रग्ज फ्री वर्धा बाबत जनजागृती तसेच हेल्मेट वाटप बाबत कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. त्याअंतर्गत पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील होतकरु व पोलीस मित्र लोकांना 65 हेल्मेट चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमा दरम्यान उपस्थीत असलेल्या 250 ते 300 नागरीकांना रस्ते विषयक नियम, वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, शिटबेल्ट व हेल्मेट चे महत्व, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर न करण्याबाबत तसेच कुठलीही नशा वगैर न करता वाहन चालविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच अंमली पदार्थ सेवणाने आपल्या आरोग्यास कोणते वाईट परिणाम होवु शकतात व आपले आपले परिवाराची हाणी कशी होवु शकते त्याचे महत्व नागरीकांना सांगण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधीकारी श्रीमती वंदना कारखेले मॅडम महालक्ष्मी प्राय. लिमी. चे पदाधीकारी व पोलिस स्टेशन देवळीचे ठाणेदार संदीप कापडे यांनी उपस्थीत रैलीला हिरवी झंडी दाखवुन सुरुवात केली. सदर रैली देवळी पोलीस स्टेशन पासुन सुरु करुन देवळी टाउन परीसरात काढण्यात येवुन पोलीस स्टेशनला समारोप झाला. सदर रैली मध्ये पोलीस स्टेशन देवळी येथील पोलीस उपनिरीक्षक अश्वीन गजभीये, पोलिस. उपनिरीक्षक. कल्पेश मगरे, तसेच पो.स्टे. देवळी येथील पोलीस अंमलदार व सैनिक, पोलीस पाटील, महालक्ष्मी कम्पनीतील स्टॉफ, तसेच देवळी शहरातील 250 ते 300 मोटार सायकल चालकांनी या मध्ये उस्फुर्त पणे सहभाग नोंदविला.
सदर कार्यक्रम यशश्वी करण्याकरीता मा. ठाणेदार संदीप कापडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. अश्वीन गजभीये, पो. उपनि. कल्पेश मगरे, तसेच पो.स्टे. देवळी येथील पोलीस अंमलदार व सैनिक, पोलीस पाटील, यांनी पार पाडला.


