ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वॉर्डनिहाय संवाद व विशेष बैठकांवर भर

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा उपविभागाची 'गुन्हे आढावा बैठक' संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली काल, दिनांक २२ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे वर्धा उपविभागाची महत्त्वाची ‘गुन्हे आढावा बैठक’ पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत वर्धा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) प्रमोद मकेश्वर यांनी ‘पावर पॉईंट प्रेझेंटेशन’ (PPT) द्वारे वर्धा विभागातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, प्रलंबित गुन्हे आणि पोलीस कारवाईचा सविस्तर आढावा सादर केला.

विभागातील अवैध धंद्यांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक पावले उचलण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विभागातील मोठ्या गावांमध्ये स्थानिक नागरिक, शांतता समिती आणि मोहल्ला कमिटीच्या विशेष बैठका आयोजित केल्या जातील. यामुळे पोलिसांना स्थानिक पातळीवर थेट व अचूक माहिती मिळणे सोपे होईल.

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वॉर्डनिहाय संवाद कार्यक्रमांचे आयोजन करावे. नागरिकांशी थेट चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांचे जागेवरच निवारण करण्याचा प्रयत्न करावा.

या बैठकीला वर्धा विभागांतर्गत येणाऱ्या सर्व ७ पोलीस स्टेशनचे ठाणेदार (प्रभारी अधिकारी) उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीवर कडक वचक निर्माण करण्याचे आणि प्रलंबित गुन्ह्यांचा तपास जलद गतीने पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

(आशिष चिलांगे) सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये