ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला सक्षमीकरणामध्ये पद्म पुरस्कारासाठी नामांकन सादर करा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ पद्म पुरस्कार – पद्मविभुषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून प्रजासत्तक दिनाच्या (२०२७) निमित्ताने जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातून नामांकने मागविण्यात येत आहे. या पुरस्कारांचा उद्देश विशेष कामगिरीची दखल घेणे हा असून कला, साहित्य व शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य विज्ञान व अभियांत्रिकी, नागरीसेवा, व्यापार व उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील / विषयांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अथवा सेवेसाठी पद्म पुरस्कार – पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले जाते.

त्याअनुषंगाने भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय यांनी महिला सक्षमीकरणामध्ये यशस्वी कामगिरीची सर्वोच्च पायरी व योगदान दिले आहेत. त्या पात्र व्यक्तिंनी पद्म पुरस्कार- पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार करीता http://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात ३१ जुलै २०२६ पर्यंत आवेदन करावे. पुरस्काराची घोषणा २६ जानेवारी २०२७ रोजी होईल, असे महिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये