ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शेततळे प्रात्यक्षिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी उंबरखेड गावातील शेततळ्याला भेट देऊन शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक सादर केले.

रावे कार्यक्रमांतर्गत आयोजित या प्रात्यक्षिकात शेततळ्याचे महत्त्व, पाणी व्यवस्थापन, शेततळ्याची देखभाल व शेतीसाठी त्याचा उपयोग याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पावसाचे पाणी साठवून दुष्काळी परिस्थितीत पिकांना संरक्षित पाणी कसे देता येईल, याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

यावेळी उंबरखेड गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रात्यक्षिक प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे उपप्राचार्य देवानंद नागरे विस्तार शिक्षण विभाग प्रमुख तथा रावे समन्वयक प्रा. मोहजितसिंह राजपूत शिक्षण प्रभारी प्रा.विलास सातपुते आणि कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सचिन सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

प्रात्यक्षिक सचिन भालेराव, सौरभ बुरकुल, जय चतरकर, गौरव चोले, ज्योतिरादित्य देशमुख, ओम ढवळे, करण फुलझाडे, हर्षल जाधव, प्रतीक जाधव व मयूर जाधव या विद्यार्थ्यांनी सादर केले.

शेतकऱ्यांनी शेततळ्याबाबत मिळालेल्या उपयुक्त माहितीबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये