चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव मही येथे पेट्रोल पंप जवळ स्विफ्ट डिझायर कार ने स्कुटी ला जोरदार धडक मारल्याने स्कूटी चालकचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 10 नोव्हेंबर रोजी घडली, याप्रकरणी पोलिसांनी कार चालक विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की
फिर्यादी श्रीकृष्ण विष्णु शिंदे रा पाडलीव शिंदे यांचे वडील विष्णु गुलाबराव शिंदे वय 73 वर्ष रा. पाडळी शिंदे हे त्यांची स्कुटी क्रं MH-28-AH.6384 ने पाडळी शिंदे येथुन देउळगावमही येथे जातअसतांना देऊळगाव महि येथील इंदल शेठ जैन यांचे पेट्रोल पंपाजवळ, विष्णु शिंदे यांचे स्कुटीला मागुन भरधाव वेगाने येणारी स्विप्ट डिझायर कार क्र MH-14-EU-5917 चा चालक सुरेश किसन चेके रा. वाकी बु याने त्याची कार भरधाव वेगाने व हलगर्जी पणाने चालवुन विष्णु गुलाबराव शिंदे यांचे स्कुटी ला जोरदार धडक देवुन गंभीर जखमी केले, विष्णु शिंदे यांचे डोक्याला गंभिर मार लागल्याने कलावती हॉस्पीटल, जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले,उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कार चालक विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहे.