ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकांनी केले विद्यालयाचे कौतुक!

चांदा ब्लास्ट

      पालक आपल्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळावं या उद्देशाने उत्तम शाळेत दाखल करतात. आपल्या अपेक्षा सांगतात तर कधी तक्रारी व्यक्त करतात. मात्र लोकमान्य टिळक स्मारक मंडळाद्वारा संचालित तीनही शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वंद्य वंदे मातरम् या महानाट्याचा प्रयोग पाहून पालक भारावले.

   लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भार्गव देशकर आणि श्लोक चांदेकर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी महानाट्यासाठी संस्था, मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांवर घेतलेल्या परिश्रमासाठी समाधान व्यक्त करत कौतुकाची भावना व्यक्त केली व शाळेला भेटवस्तू प्रदान केली.

    साक्षात पालकांनी शिक्षक मुख्याध्यापक आणि शाळेचे कौतुक करणे ही बाब आजच्या काळात विरळाच आहे.

    श्री.देशकर व श्री. चांदेकर यांनी स्मारक मंडळाचे सचिव श्री ‌गांगेय सराफ आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भेट स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शाळेला दिली.

    विद्यालयाला पालकांचा असा पाठिंबा मिळाला तर विद्यार्थ्यांचे यश निश्चित असते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये