Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वाघाच्या हल्ल्यात महीला ठार

सावली तालुक्यातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    वाघाच्या हल्ल्यात महीला ठार ही घटना आज दिनांक ३० सकाळ ला 7 वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव गावानजीक घडली. रेखाबाई मारोती येरमलवार वय 55 वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.

     रेखाबाई मारोती येरमलवार ही शुक्रवारला 11 वाजता च्या सुमारास झाडण्या कापण्यासाठी जंगलात गेली होती,नाल्याजवळ झाडण्या कापत असतात धबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात रेखाबाई जागीच ठार झाल्या.

  आई घरी पोहचवली नाही म्हणून मुलगा महादेव येरमलवार, राकेश येरमलवार व गावकरी नागरिक रात्रो शोध घेतला, पण मिळाली नाही, पुन्हा सकाळला वनरक्षक सोनेकर साहेब,महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नवनित कातलवार, व गावकरी नागरिक सकाळ शोध घेतला असता रेखाबाई ही मृत अवस्थेत जंगलात आढळला.

  मृत महिलेल्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकरी नागरिकांकडून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये