Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्य ‘संविधानाच्या उद्देशीकेचे ‘घरा -घरात वितरण

75 हजार पोस्टकार्डवर स्वहस्तलिखित 'संविधान उद्देशिका`

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

   भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य ‘संविधान दिना `पासून वर्षभर’ हर घर संविधान `साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचेच निमित्त साधून दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था,चंद्रपूर आणि आदिवासी कला संवर्धन समितीच्या वतीने संविधानाची प्रास्ताविका म्हणजे संविधानाची ओळख, संविधानाचे ध्येय व उद्दिष्ट संविधानाचा आत्मा. प्रास्ताविका वाचली तर संविधान काय आहे याची कल्पना येते. संविधानाचे महत्त्व काय हे सोप्या भाषेत सांगण्यासाठी आचार्य परमानंद तीराणीक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांनी पन्नास पैशाच्या पोस्टकार्डावर स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात संविधानाची प्रास्ताविका लिहून सर्व शाळा महाविद्यालयात व तसेच प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

या त्यांच्या या उपक्रमाला दिल्ली येथील डॉक्टर प्रीती साव फिजियोथेरेपीस, न्यूरोथेरपी, नॅच्युरोथेरपी ची मदत मिळाली आहे यांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा हातभार लागला आहे सर्वाच्या प्रेरणेतून प्रत्येक प्रास्तविकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’— या शब्दांनी होते.इंग्रजीत ‘ वुई द पीपल’— प्रास्ताविका सांगते की, भारत सार्वभौम समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य देश आहे. हा देश घडवण्याची जबाबदारी भारताच्या लोकांवर आहे म्हणून सर्वांचे सहकार्याने हे संविधानाचे 75 वे वर्ष आहे. संविधानांचा अमृत महोत्सव म्हणून हे वर्ष साजरे करावे.

   संविधानाचा जागर हा प्रभावीपणे कसा करायचा यासाठी 26 नोव्हेंबर 2024 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान होणाऱ्या अभियानाच्या माध्यमातून भारतीय संविधानातील मूल्य समता, न्याय व बंधुता या संविधानिक मूल्यांचा जागर राज्यभर विविध कार्यक्रम,चित्रकला स्पर्धा, हस्तक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आयोजित केली आहेत. त्याबरोबरच घरोघरी संविधान उद्देशिकांचे वितरण करून या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.या संविधान जागृतीसाठी राज्यातील अनेक संस्था,संघटना एकत्र आल्या आहेत नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे असे आव्हान दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र द्वारे करण्यात आले आहेत. यासाठी मुख्याध्यापिका कल्पना कडू प्राध्यापक निरज आत्राम,प्राध्यापक पोहाणे,प्रदीप कोहपरे, ग्यानीवंत गेडाम, क्रिष्णा कासुलकर, रुक्मिणी तीराणीक,दिव्यांग संस्थेचे राज्य सरचिटणीस दीपक शेवाळे, व या अभियानाचे मुख्य सूत्रधार दिव्यांग संस्थेचे जिल्हाध्यक्ष आचार्य परमानंद तिराणिक, प्राध्यापक कल्याणी शिंगरू यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये