ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे साजरी

पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पोलीस उप निरीक्षक जाधव यांनी फोटोला पुष्पहार घालून अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारत देशात साजरी करण्यात येत असून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे साजरी करण्यात आली आहे. या वेळी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक जाधव पो. स्टे. व पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड वर्धा यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या वेळी कार्यक्रम ला उपस्थित असलेले

पोलीस उप निरीक्षक शरद गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक पुणे जाधव , पोलीस ठाण्याचे अंमलदार कमलेश बडे, पोहवा पंकज भरणे, पोहवा नितेश खासबागे, पोहवा प्रशांत नांदेडकर, हवालदार घनश्याम डोणे, किशोर नोटे , महिला पोलीस अंमलदार पुनम ठाकरे, मंजुषा बुरबुरे, नितेश भोयर, नंदकिशोर धुर्वे तसेच पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा त्यांच्या विचारांतून मिळत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत श्रद्धामय व प्रेरणादायी होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये