ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रायपूर जंगलातील धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रायपूर जंगल परिसरातील धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कुमरे वय वर्ष अंदाजे 50ते 55वर्ष (रा. सालई कला) हे रायपूर जंगलातील धबधब्यावर गेले असता पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.

या दुर्दैवी घटनेमुळे सालई कला परिसरात शोककळा पसरली असून, नेमक्या परिस्थितीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये